मराठी विश्वकोश : अद्ययावत माहिती


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

आठवले, पार्वतीबाई ( 1870 - 10 ऑक्टोबर 1955) : मराठीतले पहिले स्त्री-आत्मचरित्र लिहिणारी व हिंगणे आश्रमासाठी झटणारी झुंजार विधवा स्त्री. पूर्वाश्रमीची कृष्णी जोशी. देवरुखच्या जोशींच्या गरीब कुटुंबातील पाच भावंडांमधील मुलगी. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचे आश्रित, अपंग असलेल्या पुरुषाशी लग्न करुन देण्यात आले व त्या पार्वतीबाई आठवले झाल्या. वयाच्या विशीपर्यंत तीन मुले जन्माला आली, त्यापैकी फक्त एक वाचले. पुढे त्यांना वैधव्य आले. त्यांचे तत्कालीन रुढी परंपरेमुळे केशवपन करण्यात आले.


महर्षी कर्वे यांची पत्नी आनंदीबाई ऊर्फ बाया ही त्यांची मोठी बहीण. त्यांनाही वैधव्य आले होते; परंतु कर्व्यांनी त्यांच्याशी पुनर्विवाह करुन त्यांना स्त्रीशिक्षणाच्या आपल्या कार्यात सहभागी करुन घेतले होते. बायाने आपल्या या बहिणीला घरात हातभार लावण्यासाठी ठेवून घेतले व तेथूनच त्यांच्या जीवनाला एक वेगळे वळण लागले. त्यांनी 1902 पासून 1941 पर्यंत अव्याहतपणे हिंगणे आश्रमात कार्य केले. वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळवून परीक्षा उत्तीर्ण केली व त्यांना त्यासाठी शिष्यवृत्तीही मिळाली.


या स्त्रीशिक्षणाच्या कामात संस्थेला देणग्या व आर्थिक मदतीची गरज होती व त्यासाठी कार्य करण्याचे व्रतच त्यांनी पत्करले. बनारसला त्या गेलेल्या असताना मोडक्या तोडक्या हिंदी भाषेत बोलून त्यांनी वर्गणी गोळा केली. त्यांच्यात बोलण्याची कला व कळकळ होती. त्या देशभर फिरत राहिल्या. त्यावेळी त्यांना इंग्रती शिकण्याची गरज भासू »ÖÖÝÖ»Öß; तेव्हा वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांनी प्रायमर घेऊन इंग्रजी वाचायला सुरुवात केली व शेवटी त्यासाठी अमेरिकेला जावे असे ठरविण्यात आले. हा प्रस्ताव त्यांनी तिहेरी हेतूने स्वीकारला. एक, इंग्रती शिकता येईल. दुसरे, तेथील अशा प्रकारच्या संस्थांबद्दलची माहिती मिळेल आणि तिसरे म्हणजे देणग्या मिळविता येतील. 5 ऑक्टोबर, 1918 ला त्या तुटपुंज्या आर्थिक आधारावर बोटीने जपानमार्गे अमेरिकेला जायला निघाल्या. प्रवास कोलंबो, सिंगापूर, हाँगकाँग, शांघाय, नागासाकी, टोकियो मार्गेचालला होता. वाटेत मुद्दाम त्यांनी जपान विमेन्स युनिव्हर्सिटी पाहिली. सर्व प्रकारचे शारीरिक कष्ट व मोलकरणीची कामे करत त्या शिकत राहिल्या. न्यूयार्कमधून त्यांनी चारशे डॉलर्स जमविले. 1919 मध्ये वॉशिंग्टनला आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेचे अधिवेशन होते तेथे त्या हिंदी स्त्री मजूर प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिल्या. तिथेही त्यांनी चारशे डॉलर्स जमवले. सोरॅसिस क्लबमध्ये पाचशे स्त्री सभासदांपुढे भाषण केले, तेव्हा त्या महिलांनी महर्षीसाठी एक मोटरार भेट पाठवली. 20 एप्रिल 1920 ला त्यांनी हिंदुस्थानला परतण्यासाठी प्रस्थान ठेवले.


त्यांनी संस्थेसाठी मिळवून आणलेल्या पैशातून अमेरिकन स्कॉलरशिप फंड असा कायमस्वरुपी निधी ठेवण्यात आला. आपल्या कर्तृत्वाने त्या संस्थेच्या आधारस्तंभ झाल्या. त्यांनी 'माझी कहाणी' हे आत्मचरित्र 1928 मध्ये लिहिले. पुणे येथे त्यांचे निधन झाले.


ओक, चारुशीला

खंड विभागणी

Scroll to top