मराठी विश्वकोश : अद्ययावत माहिती


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

मल्होत्रा, रवीश : (२५ डिसेंबर १९४३-) भारतीय अंतराळवीर. रवीश मल्होत्रा यांची १९८४ मध्ये सोयूझ T-११ या अवकाशयानावर सोव्हिएट रशियाच्या भारतासोबतच्या इंटरकॉसमॉस या संयुक्त मोहिमेसाठी राकेश शर्मा यांच्यासह अतिरिक्त (बॅकअप) अंतराळवीर म्हणून निवड झाली होती. रवीश मल्होत्रा यांचा जन्म लाहोर (आता पाकिस्तान) येथे झाला. त्यांनी युनायटेड स्टेट्स एअर फोर्स (USAF) टेस्ट पायलट स्कूल, एडवर्ड्स एएफबी, कॅलिफोर्निया येथून १९७४ साली पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते भारतीय वायुसेनेत दाखल झाले. तेथे त्यांनी ३० वर्ष अव्याहत देशसेवा केली. इंटरकॉसमॉस या संयुक्त प्रकल्पात निवड झाल्यानंतर त्याच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी रशिया शहराच्या बाहेर असलेल्या स्टार सिटीत दोन वर्षे घालविली. त्यानंतर त्यांनी वैमानिक प्रशिक्षक म्हणूनही अर्हता प्राप्त केली व भारतीय वायुसेनेतील वैमानिकांना प्रशिक्षण दिले. ते Su-३० सारखा कार्यक्रम, वैमानिकरहित वायुवाहन आणि जेट विमान प्रशिक्षक अशा कामांत १५० पेक्षा जास्त लोकांचे नेतृत्व करीत आहेत. हिंडॉन एअर फोर्स स्टेशन, दिल्ली येथे त्यांनी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. भारतीय वायुसेनेतून निवृत्त झाल्यानंतर मल्होत्रा यांनी बंगळुर येथील टेस्ट सेंटरवर चाचणी वैमानिक म्हणून काम पाहिले. सध्या ते एरोस्पेस डिव्हिजन ऑफ डायनॅमॅटिक टेक्नॉलॉजी (बंगळूर, कर्नाटक) या संस्थेचे सह-संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहोत. 

 
वीश मल्होत्रा यांना १९८४ मध्ये कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.


वाघ, नितीन

खंड विभागणी

Scroll to top