मराठी विश्वकोश : अद्ययावत माहिती


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

भटकर, विजय पांडुरंग : (११ ऑक्टोबर १९४६). भारतीय संगणकतज्ञ शिक्षणतज्ञ. पुणे (महाराष्ट्र) येथील प्रगत संगणन विकास केंद्र (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग;  सी-डॅक) या संस्थेचे माजी संचालक.


टकर यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील मुरम्बा या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अकोला येथेच झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून विद्युत् अभियांत्रिकी या विषयात बी.ई. (१९६५) आणि गुजरातमधील महाराजा सयाजीराव विद्यापीठातून (बडोदे) एम्. ई. (१९६८) ह्या पदव्या संपादन केल्या. तसेच त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथून पीएच्.डी. पदवी संपादन केली (१९७२).


टकर यांनी प्रारंभी टाटा कन्सल्टन्सी कंपनीमध्ये उपाध्यक्ष म्हणून काही वर्षे काम केले. १९८०-८७ या कालावधीत ते तिरुअनंतपुरम् येथील इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक होते. या पदावर कार्यरत असतानाच त्यांची १९८८मध्ये पुण्यातील सी-डॅक या संशोधन संस्थेमध्ये नियुक्ती झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केरळमध्ये अठरा कारखाने उभारले गेले. १९९२ च्या एशियाड सामन्याच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. त्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधींनी ही कामगिरी भटकर यांच्यावर सोपविली. त्यासाठी केल्ट्रॉन तिरुअनंतपुरम्‌च्या इलेक्ट्रॉनिक्स संशोधन संस्थेने भटकरांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे उद्दिष्ट पूर्ण केले. भटकर यांनी इलेक्ट्रॉनिकीची अनेक उपकरणे प्रणाल्या विकसित केल्या. सुरक्षिततेच्या आणि उत्पादनक्षमतेच्या बाबतीत त्यांनी भिलाई यंत्रसंचामध्ये सुधारणा करून दिल्या. त्यांनी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण प्रणाली, उद्योगांतील स्वयंचलित यंत्रणा आणि कोलकाता भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली विकसित केल्या.


भटकर यांनी १९९१ मध्ये अमेरिकेचे संयुक्त संस्थानातील Cray-YMP याच्या एवढ्या क्षमतेचा परम ८००० हा महासंगणक तयार केला. त्यामुळे भारत हा औद्योगिक जगात अ. सं. सं. जपान नंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा देश झाला. त्यानंतर त्यांनी १९९८ मध्ये परम १०००० हा महासंगणक बनवून देशाला (राष्ट्राला) अर्पण केला. त्यांनी तयार केलेले परम महासंगणक रशिया, जर्मनी,  कॅनडा सिंगापूर या ठिकाणी निर्यात करण्यात आले आहेत. परम संगणक प्रति सेकंद सु. एक अब्ज गणितकृत्ये करू शकतो. हा संगणक अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधनहवामान, अभियांत्रिकी लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी उपयोगी ठरत आहे.


टेरास्केल आर्किटेक्चर परम नॅशनल परम महासंगणकाच्या बांधणीनंतर त्यांनी पुढाकार घेऊन ग्रिड संगणक तयार केले. ते आज देशभरात 18 ठिकाणी 45 संस्थांमधून जोडलेले आहेत. वस्तुत: भारताच्या नॅशनल नॉलेज नेटवर्कचा पहिला आधारस्तंभ म्हणजे गरुडा ग्रिड ऑफ सी-डॅक ही संस्था आहे. ही संस्था भारतातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि संशोधन संस्थांमध्ये जोडलेली आहे. या संस्थेने एकविसाव्या शतकात तांत्रिक व औद्योगिक शिक्षणात वाढ करण्याचा मार्ग खुला
केला आहे.


टकर यांनी भारतातील सर्व भाषा संगणकावर आणून साक्षरच काय पण निरक्षरही संगणक साक्षर व्हावा असा प्रयत्न केला. त्यांनी पुण्यातील सी-डॅकमध्ये प्रगत संगणकीय शिक्षण केंद सुरू करून हजारो मुलांना संगणकाचे शिक्षण दिले. त्यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदव्युत्तर शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. तसेच त्यांनी लक्षावधी घरांमध्ये तसेच शाळांमध्ये आयसीटी (इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) पोहोचविण्याच्या उद्देशाने
एज्युकेशन टू-होम ही संस्था उभारली. ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी एका केबलमधून दूरध्वनी दूरदर्शन संच आणि संगणक चालविता येतील अशी  ब्रॉडबॅण्ड प्रणाली विकसित केली. त्यांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्ही नेट, मल्टिया डिशनेट  या संस्थाही स्थापन केल्या.


टकर यांचे आतापर्यंत १२ पुस्तके ८० शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून ते यूरोप, अमेरिका भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये अधिकृत म्हणून वापरले जातात. राष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्थांची रचना त्यांनी केली आहे. उदा., सी-डॅक, ई. आर. डी. सी. , तिरुअनंतपुरम् येथील आर अँड डी सेंटर, पुणे येथील I2IT, IIMV इत्यादी. त्यांच्या संगणकीय क्षेत्रातील अभूतपूर्व कार्याबद्दल त्यांना अनेक मानसन्मान पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील काही प्रमुख पुरस्कार पुढीलप्रमाणे : इंडियन जिओटेक्निकल संस्थेचे सुवर्णपदक (१९७६), एफ्‌आयसीसीआय पुरस्कार (१९८३), नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कार्पोरेशनचा पुरस्कार (१९८४-८५), रामलाल वढवा सुवर्ण पदक (१९९२), इलेक्ट्रॉनिक्स मॅन ऑफ इयर ॲवॉर्ड (१९९२), विविधलक्षी औद्योगिक संशोधन केंद्राचा पुरस्कार (१९९३), प्रतिष्ठित ॲल्युम्नी ॲवॉर्ड (१९९४), फिरोदिया जीवन गौरव पुरस्कार (१९९५), रोटरी एक्सलन्स ॲवॉर्ड (१९९७), लोकमान्य टिळक ॲवॉर्ड (१९९१), महाराष्ट्र भूषण ॲवॉर्ड (१९९९), ग्लोबल ई-बीज इनोव्हेशन कन्टेस्ट ॲवॉर्ड (१९९९), पद्मश्री ॲवॉर्ड (२०००), भारताचे एस्. आर्. जिंदल पुरस्कार (२०१२) इत्यादी.


भटकर हे अनेक मान्यवर संस्थांचे सदस्य आहेत. तसेच त्यांचे निरनिराळे शोध, उपक्रम आयटी क्षेत्रातील योगदान यांमुळे त्यांना जागतिक इलेक्ट्रॉनिकी संगणक क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या आयईईई, एसीएम, सायंटिफिक ॲडव्हायझरी कमिटी, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया इत्यादी अनेक नामवंत संस्थांनी फेलो या अत्युच्च पदवीने पुरस्कृत केले आहे. 

 

मगर, सुरेखा 

खंड विभागणी

Scroll to top