गावसकर, सुनील मनोहर


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

गावसकर, सुनील मनोहर : (१० जुलै १९४९). क्रिकेटमध्ये अनेक जागतिक विक्रम करणारा प्रसिद्ध भारतीय खेळाडू. याचा जन्म मुंबईत झाला. तेथील सेंट झेवियर्स शाळा त्याच नावाच्या महाविद्यालयात त्याचे शिक्षण झाले. १९७० मध्ये त्याने बी.ए. ची पदवी संपादन केली. १९७४ मध्ये त्याचा विवाह मार्शनील मेहरोत्रा या युवतीशी झाला. त्यांना रोहन हा एक मुलगा आहे. गावसकरचे वडील आणि काका हे चांगले क्रिकेटपटू होते. त्याचे एक मामा माध्व मंत्री ह्यांनी ही भारतातर्फे कसोटी सामन्यात भाग घेतला होता. शिवाय त्याचे दोन्ही आजोबा आणि आई ह्यांना क्रिकेटविषयी विशेष प्रेम होते. ह्या क्रिकेटमय वातावरणात वाढल्यामुळे सुनीलला लहानपणापासूनच क्रिकेटची उत्कट आवड निर्माण झाली. घरातील सर्व मंडळींनी त्याला क्रिकेट खेळण्यास मनापासून प्रोत्साहन दिले. आपण चांगला फलंदाज बनणार, हे त्याने प्रथमपासून ठरविले होते. लहानपणापासून खेळताना बाद होण्याच्या जिद्दीने तो खेळत असे. शाळेच्या कनिष्ठ संघात असल्यापासूनच त्याने फलंदाजीचे तंत्र आत्मसात केले. बॅट सरळ कशी धरायची, बॅटवरची हाताची पकड कशी ठेवायची आणि झेल उडू नये म्हणून कोणता पवित्रा घ्यायचा, या बाबतींत त्याला प्रसिद्ध प्रशिक्षक कमल भांडारकर यांचे मार्गदर्शन मिळाले.


गावसकर मुंबईच्या आंतरशालेय हॅरिस ढाल स्पर्धेत (१९६५-६६) खेळला. त्याच वर्षीच्या कुचबिहार करंडक सामन्यात पश्चिम विभागाच्या संयुक्त शालेय संघातर्फे खेळताना गावसकर याने एकूण ७६० धावा काढल्या होत्या. यामुळे कसोटीत लंडन शालेय संघाविरुद्ध त्याने शतक  झळकावले. त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट शालेय खेळाडूसाठी असलेला जे. सी. मुखर्जी करंडक त्याला मिळाला. यानंतर त्याने आपले क्षेत्ररक्षण सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि यष्टीजवळील, विशेषकरून स्लिपमधील जागेवरील, क्षेत्ररक्षणात प्रावीण्य संपादित केले.


महाविद्यालयात गेल्यावर त्याला दर शतकामागे वडिलांकडून दहा रुपये प्रोत्साहन म्हणून मिळत. महाविद्यालयीन क्रिकेटमध्ये पदार्पण करताच त्याने गुजरात विद्यापीठाविरुद्ध शतक ठोकले. आंतरविद्यापीठ सामन्यांत मुंबई विद्यापीठाकडून खेळताना त्याचा वेस्ट इंडीजच्या हंट याच्याशी परिचय झाला. फटका मारण्याआधी बॅट उचलून मागे सरण्याचा (बॅक लिफ्ट) पवित्रा, बॅट खूपच सरळ आणि उंच उचलणे डावा पाय चेंडूच्या टप्प्यापर्यंत पुढे ताणणे, या हंटच्या तंत्रावर त्याने स्वत:चे फलंदाजीचे तंत्र बेतले.


अने प्रसिद्ध क्रिकेटपटू देणाऱ्या दादर युनियन स्पोर्टिंग क्लब चा सुनील सभासद झाला (१९६९). विझी करंडकासाठीच्या आंतररविद्यापीठ विभागीय सामन्यात त्याने पश्चिम विभागाचे नेतृत्व करून हा करंडक जिंकला १९६९. पुढच्या मोसमात त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई विद्यापीठ संघाने रोहिंग्टन बारिया करंडक जिंकला. त्याच वर्षी तो भारतीय संयुक्त विद्यापीठ संघाकडून न्यूझीलंडविरुद्ध खेळला. तसेच श्रीलंकेत उपकर्णधार म्हणूनही तो गेला होता. तिकडे त्याने बलाढ्य अशा तेथील अध्यक्षीय संघाविरुद्ध द्विशतक केले. १९७०-७१ मध्ये पुण्यात झालेल्या आंतरविद्यापीठ सामन्यात ३२७ धावा काढून त्याने बारा वर्षांपूर्वी अजित वाडेकर यानी केलेला ३२४ धावांचा विक्रम मोडला.


वेस्ट इंडीजला जाणाऱ्या भारतीय संघात त्याची निवड झाली १९७१. ही त्याची पहिली कसोटी मालिका. पाच सामन्यांच्या ह्या मालिकेतील फक्त चार सामन्यांत तो खेळला. त्यांत त्याने एकंदर ७७४ धावा काढल्या. त्यांत त्याची चार शतके होती. त्यांपैकी एका कसोटीतच एका डावात शतक दुसऱ्यात द्विशतक काढून त्याने डग वॉल्टर्सच्या विक्रमाची बरोबरी केली. यामुळे शेष विश्वसंघात त्याची निवड होऊन तो ऑस्ट्रेलियात गेला. तेथे सर डॉन ब्रॅडमनच्या हस्ते त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे पारितोषिक मिळाले होते. एकूण ४७ कसोटी सामन्यांत त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले. यांपैकी सामने भारताने जिंकले ३० अनिर्णित राहिले. 

गावसकरने आपल्या पहिल्या हजार धावा ११ कसोटीतील २१ डावांत काढल्या होत्या. त्याने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले असून त्यांपैकी काही विक्रम पुढीलप्रमाणे : सलगपणे १०२ कसोटी सामने खेळण्याचा जागतिक विक्रम (१९७६), कसोटीत तीन वेळा दोन्ही डावांत शतक काढण्याचा विक्रम (१९७१, १९७८, १९७८-७९); लागोपाठच्या तीन डावांत शतके काढण्याचाही विक्रम दोन वेळा केला. त्याने शंभरांहून अधिक धावांच्या ५८ भागिदाऱ्या केल्या. प्रथम जाऊन शेवटपर्यंत नाबाद राहण्याचा विक्रम दोनदा केला (१९७४-७५ च्या इराणी करंडकाचा सामना आणि १९८२-८३ चा फैसलाबाद येथील पाकिस्तानविरुद्धचा सामना). सोबर्सचा सर्वाधिक ८,०३२ धावांचा विक्रम बॉयकॉट याने १९३ डावांत (१०८ कसोटी सामन्यांत), तर गावसकरने १६८ डावांत (९६ कसोटी सामन्यांत) मोडला. यातील शेवटचा सामनापुरा झाला तेव्हा ६५ अर्धशतके (२९ शतके ३६ अर्धशतके) काढण्याचा आणि एका कॅलेंडर वर्षात १००० धावा चौथ्यांदा काढण्याचा जागतिक विक्रमही त्याने केला; ८० डावांत (५२ कसोटी सामन्यांत) ब्रॅडमनने केलेल्या २९ शतकांची बरोबरी गावसकरने १६६ धावांत (९५ कसोटी सामन्यांत) केली. २१४ पैकी १९१ डावांमध्येच तो सलामीचा फलंदाज म्हणून खेळला ह्यात एकूण १९ खेळाडूंनी त्याला साथ दिली; १९८७ मध्ये ३४ कसोटी शतके १० हजारांहून जास्त धावा (१०,१२२) काढणारा गावसकर हा एकमेव भारतीय खेळाडू ठरला.


कसोटी सामन्यांशिवाय एक दिवसाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांत, तसेच इराणी, दुलीप रणजी करंडक स्पर्धांतही तो खेळला आहे. दुलीप करंडकात पदार्पण केले तेव्हाच त्याने शतक ठोकले त्यात त्याने संघाचे नेतृत्व केले होते. शिवाय कसोटी सामन्यात त्याने आघाडीचा गोलंदाज म्हणून (६३.२ षटके - बळी) कामगिरी निभावून नेली. कसोटी सामन्यांत त्याने एकूण १०८ झेल घेतले. तंत्रशुद्ध शैली, संयम समतोलपणा, मेहनत (सराव), अभ्यासू जिज्ञासू वृत्ती, समोरच्या खेळाडूचे गुणदोष चटकन लक्षात घेणे खेळावर चित्त एकाग्र होणे, तसेच स्वत:चे तंत्र कुठे चुकत असेल तर जेष्ठ खेळाडूकडून समजावून घेऊन ते सुधारण्याचा प्रयत्न करणे, ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. यष्टीजवळ क्षेत्ररक्षण करताना इतरांच्या फलंदाजीतील बारकाव्यांचेही तो निरीक्षण करी. परिणामी तो सर्व प्रकारचे फटके मारू शकत असल्यामुळे त्या काळातील जगातील सर्व गोलंदाजांची, विशेषत: आघाडीचा फलंदाज असल्याने जलदगती गोलंदाजांची, गोलंदाजी त्याला यशस्वीपणे खेळता आली. क्रिकेटविषयीचे तांत्रिक ज्ञान, नियम आणि या खेळामागची कणखर वृत्तीही त्याने चांगली समजून घेतली होती. कर्णधार असताना त्याला एकूणच भारतीय संघाला या सगळ्यांचा उपयोग झाला. थोडक्यात सुनील गावसकर हा खरा अभ्यासू खेळाडू होय. भारतीय क्रिकेटमध्ये त्याने इर्षा निर्माण केली. क्रिकेटपटूंचे हितसंबंध सांभाळण्याचे कामही त्याने तत्परतेने केले. खेळातून निवृत्त झाल्यावरही त्याची हीच वृत्ती दिसून येते. कारण क्रिकेटचे सर्वांगीण प्रशिक्षण देणारी एक मोठी संस्था उभारण्याचे त्याचे प्रयत्न चालू आहेत. त्याचे अनुकरणीय गुण म्हणजे निर्व्यसनीपणा, मितहार, नियमितपणा आणि सध्याच्या काळात दुर्मिळ अशी मातृपितृभक्ती हे होत.


सुनी गावसकरच्या क्रिकेटमधील या महान कामगिरीचा गौरव झाला असून त्यास याबद्दल भरपूर मानसन्मान लाभले आहेत. त्यांपैकी काही मानसन्मान पुढीलप्रमाणे आहेत : पी. जे. हिंदू जिमखान्यातर्फे देशातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूला देण्यात येणारे एल्. आर. तेरसी सुवर्णपदक (१९७०-७१ १९७५-७६ असे दोनदा); हंगामातील उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून मिळालेला मुंबई क्रिकेट असोसिएशनचा जस्टीस तेंडुलकर करंडक (१९७०-७१); शिवछत्रपती पुरस्कार (१९७१-७२); उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी असलेले एस. व्ही. राजाध्यक्ष पारितोषिक (१९७२-७३); अर्जुन पुरस्कार (१९७७); पद्मभूषण (१९७९); विस्डेनचा सर्वोत्कृष्ट फलंदाज पुरस्कार (१९८०); मुंबईच्या वानखेडे क्रीडासंकुलातील एका भागाला सुनील गावसकर कक्षहे नाव (१९८५); क्रिकेटच्या अलंकार हे ब्रॅडमनचे उद्गार वगैरे. अन्नमलाई विद्यापीठाने त्याला डॉक्टरेटची पदवी दिली आहे. मुंबईचे नगरपालहे पदही त्याने भूषविले आहे (१९९४-९५). भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २५ लाख रु रोख आणि स्मृतिचिन्ह असे स्वरूप असणारा २०११-१२ चा सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार सुनिल गावसकर यांना प्रदान केला आहे.


सुनील गावसकर याने सनी डेज (१९७६), आयडॉल्स (१९८३), रन्स इन रुइन्स (१९८४) आणि वन डे वंडर्स (१९८५) ही पुस्तके लिहिली आहेत. इंडियन क्रिकेटर या नियतकालिकाचा तो संपादक होता. शिवाय तो नियतकालिकांत क्रीडाविषयक स्तंभलेखन करतो. त्याने एका चित्रपटात अनेक जाहिरातपटांत काम केले असून दूरदर्शनवर क्रिकेटविषयक मालिकांचे समालोचनही केले आहे.


साठ्ये, प्रकाश श्री. 

खंड विभागणी

Scroll to top